अलिबाग ः प्रतिनिधी – आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने 300 कोटी सहा लाख रुपयांचा एकत्रित व्यवसायाचा पल्ला गाठला आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात संस्थेला दोन कोटी 55 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे, अशी माहिती आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली.
2019-20 या आर्थिक वर्षात संस्थेच्या एकत्रित व्यवसायात 53 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. ठेवींमध्ये 33 कोटी रुपयांनी वाढ झाली असून, 176 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. 124 कोटी सहा लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. भाग भांडवल आठ कोटी 41 लाख रुपयांचे आहे. संस्थेचा स्वनिधी 16 कोटी 99 लाख रुपये आहे. 58 कोटी 66 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
नेट एनपीए 0.96 टक्के आहे.
संस्थेच्या अलिबाग, कुरूळ, चोंढी, पिंपळभाट, चेंढरे, नागाव, मुरूड, पोयनाड ठिकाणी शाखा कार्यरत आहेत. या सर्व शाखा अद्ययावत आहेत. आता ग्राहकांना घरबसल्या सुविधा देण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने आम्ही पावले उचलली आहेत. लवकरच ग्राहकांसाठी डिजिटल आणि मोबाइल बँकिंग सेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली.