Breaking News

रायगड जिल्ह्यातील 2500 मच्छीमारांना कोरोनाचा फटका

उरण : प्रतिनिधी
राज्यातील लाखो मच्छीमार याआधीच विविध नैसर्गिक अस्मानी संकटात सापडले असतानाच आता त्यामध्ये कोरोना महामारीच्या सुलतानी संकटाची भर पडली आहे. कोरोनामुळे रायगड जिल्ह्यातील सुमारे 2500 मच्छीमारांसाठी राज्य वित्त विभागाकडून डिझेल परताव्याची आलेली साडेसहा कोटीची रक्कम मार्च अखेरपर्यंत वाटपाविना माघारी गेली आहे. रायगड मत्स्यविभागाच्या अधिकार्‍यांच्या अनास्थेमुळे परताव्याची रक्कम परत गेल्याचा आरोप मच्छीमार संस्थांकडून केला जात आहे.
रायगड जिल्ह्यात दोन हजार 227 मच्छीमार बोटी आहेत. मच्छीमार संस्थांच्या मागणीला अनुसरून राज्याच्या वित्त विभागाने थकित असलेल्या 32 कोटींच्या डिझेल परताव्यापैकी सहा कोटी 49 लाखांचा निधी जिल्ह्यातील मच्छीमारांसाठी पाठविला होता, मात्र ही रक्कम वाटप न होताच माघारी गेली आहे. परताव्याची रक्कम मिळाली नसल्याने मच्छीमारांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. ते पाहता परताव्याची रक्कम राज्याच्या वित्त विभागाकडून पुन्हा मत्स्यविभागाकडे हस्तांतरित करण्यात यावी, अशी उरण करंजा येथील वैष्णवी माता मत्स्यव्यवसाय विविध कार्यकारी सहकारी संस्थेची मागणी आहे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply