Breaking News

पोलीस हवालदाराची आत्महत्या

पनवेल : वार्ताहर

खारघर पोलीस ठाण्यात नेमणूक असलेल्या पोलीस हवालदार संतोष पाटील यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेने पोलीस वर्तुळात भितीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.

खारघर पोलीस स्टेशन नेमणूक असलेले पोलीस हवालदार 179 संतोष नामदेव पाटील (वय 47, रा. सरस्वती कोहौसो प्लॉट नंबर 83 सेक्टर 12, खारघर) यांनी त्याच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी पत्नीसह दोन मुली घरात होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार सतीश पवार यांनी पाटील यांना तेरणा हॉस्पीटल येथे उपचार करण्यासाठी आणले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मयत घोषित केले. खारघर पोलीस स्टेशन नेमणूक असलेले पोलीस हवालदार 179 संतोष नामदेव पाटील हे काही दिवसापासून आजारी असल्याने गैरहजर होते. ही घटना समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी हे घटनास्थळी पोहचले व त्यांनी पुढील सोपस्कार पूर्ण केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply