Saturday , June 3 2023
Breaking News

पनवेलमध्ये नववर्षाचे जल्लोषात स्वागत; शोभायात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त

चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याला नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी नववर्ष स्वागत समितीच्या वतीने पनवेलमध्ये शनिवारी (दि. 6) आयोजित गुढीपाडवा शोभायात्रेस नागरिकांनी पारंपरिक वेशात मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

नववर्ष स्वागत समितीच्या वतीने पनवेलमध्ये सन 1999पासून शोभायात्रा काढली जाते. यंदा शोभायात्रेचे 21वे वर्ष होते. शहरातील व्ही. के. विद्यालयाच्या समोरून सकाळी 6.30 वाजता या शोभायात्रेला प्रारंभ झाला. शोभायात्रेत सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, संतोष शेट्टी, नगरसेविका मुग्धा लोंढे, भाजप शहराध्यक्ष जयंत पगडे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत यांच्यासह लोकप्रतिनिधी, नववर्ष स्वागत समिती अध्यक्ष अमित ओझे, सचिव अविनाश कोळी, सुनीता खरे, डी. जी. शिंदे, तेजस वाडकर, सोनाली शेठ, योगेश रानडे, ज्योती कानेटकर, तसेच अनेक संस्था-संघटनांचे पदाधिकारी व सदस्य आणि नागरिकांनी सहभाग घेतला.

शोभायात्रेत रामरथ, लेझीम पथक, बोथाटी पथक, ढोल पथक, बरची पथक, विविध चित्ररथ, ध्वज पथक, लाठीकाठी पथकाचा समावेश होता. या वेळी नववर्षाचे स्वागत करताना पनवेल प्रफुल्लित झाल्याचे दिसून आले. शिवाजी रोड, आदर्श हॉटेल, श्री विरुपाक्ष मंदिर, जयभारत नाका, टिळक रोड यामार्गे मार्गक्रमण करीत या शोभायात्रेचा समारोप स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात झाला.

Check Also

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य …

Leave a Reply