मुरूड ः प्रतिनिधी – संचारबंदीच्या काळात येथील श्री. छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यशवंतगर नांदगाव हायस्कूलमधील मुख्याध्यापक चिंतामणी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर वृंदाने मुरूड आगारातील एसटी चालक-वाहक व काशीद ग्रामपंचायतीमधील दोन आदिवासीवाडीमधील लोकांना तांदूळ, डाळ व गोडेतेल पाकिटांचे वाटप केले.
या वेळी मुख्याध्यापक चिंतामणी जोशी, पर्यवेक्षक उत्तमराव वाघमोडे, सहशिक्षक प्रतीक पेडणेकर, सागर राऊत, लिपिक मंगेश नांदगावकर, संतोष बुल्लू, आगार व्यवस्थापक सनील वाकचौरे, काशीद ग्रामपंचायत सरपंच नम्रता कासार, काशीद पोलीस पाटील समृद्धी राणे, ग्रामपंचायत सदस्य संतोष राणे, शुभरा कासार, अंकुश चाचे, जान्हवी दिवेकर, तुळसा पवार, प्रशांत खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. तहसीलदार गमन गावित व सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे काशीद येथील आदिवासी वाडी वंचित राहिली असून त्या आदिवासी वाडीलाही मदत पोहचली पाहिजे, अशी इच्छा प्रकट केली होती. त्याप्रमाणे सदर दोन्ही ठिकाणी जाऊन धान्य वाटप करण्यात आले. याबाबत नांदगाव हायस्कूलमधील कर्मचारी वृंदाचे कौतुक करण्यात येत आहे.