Breaking News

भटक्या कुत्र्यांना अन्नदान; रोह्यातील प्राणीमित्रांनी जपली भूतदया

रोहा ः वार्ताहर – देशभरातील लॉकडाऊनमुळे भटके श्वान, रस्त्यावर फिरणार्‍या गायी तसेच अन्य प्राण्यांना अन्न मिळत नसल्यामुळे त्यांचे हाल होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर रोह्यातील प्राणीमित्र कुमार देशपांडे, शेखर सप्रे, स्वप्ना सप्रे व रोह्यातील अन्य प्राणीमित्रांनी एकत्र येत विशेष अभियान हाती घेतले आहे. लॉकडाऊनच्या काळात ते रोह्यातील प्राण्यांना नित्यनेमाने दहीभात खाऊ घालून नवसंजीवनी देण्याचे पुण्यकर्म करीत आहेत. हे तिघेही जण मेहेंदळे हायस्कूलजवळ राहतात. रोज रात्री वेगवेगळ्या भागातील भटक्या कुत्र्यांना ते दहीभात आणि त्यात थोडी पेडिग्री असे मिक्स करून खायला घालतात. प्राण्यांची उपासमार होऊ नये व लॉकडाऊनच्या काळात त्यांच्याही पोटाला अन्न मिळावे यासाठी ते प्रयत्नशील आहेत. मुक्या प्राण्यांसाठी ते करीत असलेल्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अनेक सेवाभाव जपणार्‍या रोहेकरांनी याकामी त्यांना मदतीचा हात पुढे केला आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply