Breaking News

गुरुनानक जयंती उत्साहात साजरी

पनवेल : रामप्रहर वृत्त

शीख समाजाचे धर्मगुरू गुरुनानक यांची 550वी जयंती मंगळवारी (दि. 12) पनवेल परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त कळंबोली, नवीन पनवेल आणि खारघर येथील गुरुद्वारांना भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी आणि रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन दर्शन घेतले.

श्री गुरुनानक देव जी यांच्या जयंतीनिमित्त कळंबोली आणि नवीन पनवेल येथील गुरुद्वारांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जयंतीचे औचित्य साधून कळंबोली येथे गुरुद्वारा श्री गुरुनानक सचखंद सभा यांच्या नामफलकाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती लीना गरड, प्रभाग समिती अ चे अध्यक्ष शत्रृघ्न काकडे, ब चे अध्यक्ष संजय भोपी, नगरसेवक एकनाथ गायकवाड, संतोष शेट्टी, मनोज भुजबळ, अमर पाटील, निलेश बावीस्कर, समीर ठाकूर, राजू शर्मा, नगरसेविका विद्या गायकवाड, भाजप पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, युवा नेते हॅप्पी सिंग यांच्यासह शीख बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …

Leave a Reply