उरण : रामप्रहर वृत्त
जगासह आपल्या देशात व राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे बळी जाणार्यांचा आकडा दिवसेंदिवस फुगत चालला आहे. हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संसर्ग नियंत्रण कक्षाची नियुक्ती करण्यात आली आहे. उरण नगरपालिकेनेही नोडल अधिकारी, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या नेतृत्वाखाली कोरोना संसर्ग नियंत्रण पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकात शहरात परगावी, परदेशातून व इतर ठिकाणावरून येणार्या व्यक्तींची इत्यंभूत माहिती घ्यावी. नंतर ती माहिती या पथकाला कळवावी, जेणेकरून त्यांची चाचणी करून त्यांना सुरक्षित स्थळी हलविले जाईल. यामुळे कोरोनाचा शिरकाव आपल्यापर्यंत पोहचणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. उरणचा संसर्ग नियंत्रण पथक पुढीलप्रमाणे- नोडल अधिकारी, मुख्याधिकारी अवधूत तावडे, पथक प्रमुख अनिल जगधनी, सचिव ए. व्ही. कांबळे, झेड. आर. माने, महेश लवटे, सचिन भानुसे, जगदीश म्हात्रे आदींसह अनेक सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वरील पथकाचे समन्वयक साधण्यासाठी समन्वयक अधिकारी म्हणून संतोष पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या शेजारीपाजारी अथवा परिसरात कोणी बाहेरून किंवा परदेशातून येऊन वास्तव्यास असेल त्यांची माहिती त्वरित संसर्ग पथकाला द्यावी. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबर आपला परिसर वाचण्यास मदत होईल, असे आवाहन पथकाचे समन्वयक संतोष पवार यांनी दिली.