रसायनी : रामप्रहर वृत्त : जागतिक महिला दिनानिमित्त रायगड जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे श्री साईकृपा शेळके मंगल कार्यालयात महिलांकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अॅड. प्रतीक्षा लाड, महिला संरक्षण अधिकारी रेणू गिते, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हाध्यक्षा वर्षा पाटील, हेमलता चिंबुलकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करून स्फूर्तिगीत गायन झाले. आजच्या जीवनात महिला विविध स्तरावर कामगिरी करून कशी वाटचाल करीत आहे, हे लघुचित्रपटावरून दाखविण्यात आले. या वेळी कर्जत नगराध्यक्षा सुवर्णा जोशी व अॅड. प्रतीक्षा लाड यांनी महिलाशक्ती आधारित मनोगत व्यक्त केले, तर काही मान्यवरांनी आर्थिक साक्षरताविषयक महिलावर्गाला मार्गदर्शन केले.दुपारनंतर महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. लिंबू चमचा, शंभर मीटर धावणे, कबड्डी, खो-खो आदी महिलांचे कार्यक्रम झाले. या खेळांत महिलांनी उत्तम कामगिरी करून ’हम किसी से कम नही’ हे दाखवून दिले. यानंतर महिलांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम होऊन पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी वर्षा पाटील, माधुरी देवीकर, विमल पाटील, दीपक पोटभरे, मीराताई थोरवे, हेमलता चिंबुलकर, रेणू गिते आदींसह जिल्ह्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …