नागोठणे : मूळचे नागोठणे येथील व सध्या गोरेगाव (रायगड) येथे वास्तव्यास असलेले महसूल खात्यातील निवृत्त मंडळ अधिकारी दत्तात्रय उर्फ अरुण संतुराम देशपांडे यांची पत्नी तथा येथील ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य शैलेंद्र देशपांडे यांच्या काकी अरुणा देशपांडे
(76) यांचे राहत्या घरी नुकतेच निधन झाले. अरुणा देशपांडे मूळच्या आदगाव, श्रीवर्धन येथील रहिवासी होत्या. सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्या परिचित होत्या. अरुणा देशपांडे यांच्या निधनाचे वृत्त समजताच गोरेगाव व नागोठण्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मनसेचे रायगड जिल्हा चिटणीस किशोर देशपांडे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात पती दत्तात्रय देशपांडे, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.