Breaking News

मिळेनासा झाला ‘एक घास काऊचा’

पनवेल : वार्ताहर – कावळा असा पक्षी आहे की शहरात असो नाहीतर गावात कावळा सगळीकडे आढळतो. त्यामुळेच लहान मुलांना घास भरवताना प्रत्येक आई एक घास काऊचा, एक घास चिऊचा म्हणत भरवत असते. पण लॉकडाऊनमुळे या काऊलाच घास मिळेनासा झालेले दिसत आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे शहरात लॉक डाऊन असल्याने हॉटेल, खाद्य पदार्थाच्या गाड्या आणि दुकाने बंद आहेत. त्यामुळे तेथे पाडलेल्या पदार्थावर जगणार्‍या कावळ्याला खायला काही मिळत नाही. कामगार कामावर जात नसल्याने त्यांच्या डब्यातील उरलेले अन्न टाकले जात नाही. शहरात वाळवण हा प्रकार फारसा नसतो. एसटी स्थानकावर गाड्या बंद असल्याने प्रवाशी नाहीत. त्यामुळे त्यांनी गाडीतून टाकलेले पदार्थ ही दिसत  नाहीत. त्यामुळे कावळ्यांना ही अन्न मिळत नाही. अनेक कावळे  दिवसभर एसटी स्थानकावर पाणपोई जवळ सांडलेले पाणी पिताना दिसत आहेत. 

आपल्या संस्कृतीमध्ये काक स्पर्शाला फार महत्व आहे. पितृपक्षात पानाला काकस्पर्श होण्यासाठी अनेक तास वाट पहावी लागते. पण आज कावळ्यांना खायला कोणी देणे तर बाजूलाच राहिले पण बाजूला पडलेले अन्नपदार्थ ही त्यांना खायला मिळत नाहीत. त्यांची होणारी उपासमार पाहून  शनिवारी सकाळी पाणपोई चालवणार्या व्यक्तिला त्यांची दया आल्याने त्याने त्याच्या जवळ असलेली वेफर्सची दोन-तीन पाकिटे फोडून टाकताच सगळे  कावळे वेफर्सवर तुटून पडलेले पाहायला मिळाले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply