पनवेल : बातमीदार – रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पनवेल या महाविद्यालयाने सध्याच्या कोरोना संकटकाळात संशोधक प्राध्यापकांना आपल्या घरातूनच आपल्या ज्ञानाची परिसीमा वाढविता यावी, यासाठी सोमवारी (दि. 1) इम्पॅक्ट ऑफ कोविड 19 ऑन ग्लोबल अॅण्ड इंडियन इकोनॉमि या विषयावरील आंतरराष्ट्रीय वेबिनारचे यशस्वी आयोजन केले.
वेबिनारचे प्रमुख वक्ते नॉर्थ युनिव्हर्सिटी, साऊथ आफ्रिका येथील प्रोफेसर डॉ. रेना रविंदर व दुसरे प्रमुख वक्ते बनारस हिंदू युनिव्हर्सिटीच्या अर्थशास्त्र विभागातील प्रोफेसर डॉ. जे. बी. कोमरिया हे होते.
परदेशातून तसेच भारतातून 3500 एवढ्या मोठ्या संख्येने सहभागी प्राध्यापकांच्या उपस्थित झालेल्या आंतरराष्ट्रीय वेबिनारासाठी प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. एन. आर. मढवी, प्रा. सोपान गोवे, डॉ. गिरीश गुंड, डॉ. लीना मेश्राम यांनी परिश्रम घेतले.