उलवे नोड : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गव्हाण जिल्हा परिषद गट तसेच वहाळ व गव्हाण पंचायत समिती गणामध्ये भाजप महायुतीच्या उमेदवारांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. महायुतीच्या उमेदवारांनी शुक्रवारी (दि. 30) घरोघरी भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधला.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली गव्हाण जिल्हा परिषद गट तसेच वहाळ व गव्हाण पंचायत समिती गणामध्ये भाजप महायुतीचे उमेदवार जोमाने प्रचार करत असून विजयासाठी सज्ज झाले आहेत. अनुभवी आणि विकासाभिमुख नेतृत्वामुळे प्रचाराला मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन मिळत आहे.
या प्रचार मोहिमेत भाजप नेते रविशेठ पाटील, पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा घरत, नगरसेविका प्रतिभा भोईर, कोळी समाजाचे नेते उत्तम कोळी, शैलेश भगत, निलेश खारकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रचारादरम्यान उमेदवार निकिता खारकर यांनी सांगितले की, विकासकामांच्या जोरावर आम्ही मतदारांसमोर जात आहोत. मिळणारा प्रतिसाद पाहता आमचा विजय निश्चित आहे, असा विश्वास वाटतो, तर वितेश म्हात्रे म्हणाले की, आमदार महेश बालदी यांनी केलेली विकासकामे आम्ही जनतेपर्यंत पोहचवत असून घराघरात जाऊन लोकांशी थेट संवाद साधत आहोत. आम्ही केलेल्या कामांवर मतदार समाधानी आहेत. त्यामुळे विरोधकांकडे आता आरोप करण्याशिवाय काही उरलेले नाही.
कष्टकर्यांचे द्रष्टे नेते स्व. जनार्दन भगत, लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते जे.एम.म्हात्रे, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, वाय.टी. देशमुख यांची जन्मभूमी असलेल्या गव्हाण विभागाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम या नेतृत्वाने गेल्या अनेक वर्षांत केले आहे. नागरिकांचे प्रश्न सातत्याने सोडविणे, लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि कोणत्याही भेदभावाविना मदतीचा हात देणे ही या नेतृत्वाची ओळख आहे.
सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांच्या सहकार्यांनी कायम लोकाभिमुख कार्यपद्धती अवलंबली आहे. आपल्याकडे येणार्या प्रत्येक नागरिकाला मदत करणे हा त्यांचा स्थायीभाव राहिला असून यामुळेच त्यांना नेहमीच जनतेचा भरघोस पाठिंबा लाभला आहे. या विश्वासार्ह आणि विकासाभिमुख नेतृत्वाचा लाभ भाजप महायुतीच्या उमेदवारांना निवडणुकीत निश्चितच होणार असून गव्हाण जिल्हा परिषदमध्ये निकिता खारकर, वहाळ पंचायत समितीमधून वितेश म्हात्रे आणि गव्हाण पंचायत समिती गणामध्ये जिज्ञासा कोळी या तीनही उमेदवारांचा अर्थात भाजप महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
Check Also
चित्रपटाच्या नवीन भागांचा ट्रेंड
बस्स एक पिक्चर सुपर डुपर हिट होऊ देत… त्याच्या वाढत्या उत्पन्नाच्या भराभर ब्रेकिंग न्यूज येऊ …
RamPrahar – The Panvel Daily Paper