मुरूड ः प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुरूड तालुका बौद्ध समाज सेवा संघाकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील आगरदांडा, खरआंबोळी, सायगाव, तेलवडे, विहूर, माजगाव, नांदगाव, उसरोळी, वाकळवती आदड, काशीद, बारशीव, बोर्ली आदी गावांतील मोलमजुरी करणारे मजूर, निराधार विधवा महिला व अपंग घटकातील 250 कुटुंबांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.
सदर उपक्रमात स्थानिक तालुका समिती अध्यक्ष वसंत मोरे, स्मारक समिती अध्यक्ष मनोहर तांबे, तालुका आरपीआय अध्यक्ष बबन शिंदे, नरेश तांबे, मंगेश मोरे, रघुनाथ कांबळे,
धर्मेंद्र गायकवाड, मंगेश येलवे आदी सहभागी झाले होते. या वेळी तहसीलदार गगन गावित यांनी उपस्थित राहून या कार्याला प्रात्साहन दिले.