उरण : वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. उरण नगरपरिषदकडून नागरिकांची सुरक्षा, त्यांचे आरोग्य चांगले राहावे त्याकरिता विविध प्रकारच्या माध्यमातून कोरोना संदर्भात जनजागृती करीत आहे. नागरिकांनी कोणती व कशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे याबाबत मोठ्या प्रमाणत जनजागृती केली जात आहे.
उरण नगरपरिषदेने कोरोनाबाबतच्या जनजागृतीसाठी विविध माध्यमांचा वापर केला आहे. त्यानुसार शहराच्या प्रमुख चौकांत रस्त्यांवर संदेश रेखाटण्यात येत आहेत. उरण शहरातील चार ठिकाणी केले आहे. त्यात वीर सावरकर मैदान (लाल मैदान), कोट नाका जरीमरी मंदिर, आपला बाजार, मंगल मूर्ती किराणा दुकान, या ठिकाणी रस्त्यावर संदेश रेखाटले आहेत, कोरोनाचा प्रवास रोखण्यासाठी आज आवश्यक नसेल तर आपला प्रवास टाळा, घरातच रहा सुरक्षित रहा, आपल्या घराभोवती आखलेली स्व रक्षणाची लक्षमण रेषा ओलांडायची नाही, आपण खरच कामासाठी बाहेर पडताय? विनाकारण फिरत असाल तर कुटुंब व शहराला धोक्यात आणत आहार, स्पर्धा, समारंभ, स्नेह संमेलन टाळा कोरोनाला पराभूत करण हेच ध्येय पाळा, घाबरू नका-पण सावध रहा, असे जनजागृतीपर संदेश प्रमुख चौकांत रेखाटण्यात आले आहेत. नगरपालिकेच्या या उपक्रमाचे सर्व नागरिकांनी स्वागत केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप उरण तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, उरण शहर महिला अध्यक्षा संपूर्णा थळी, उरण नगरपरिषद आरोग्य सभापती रजनी सुनील कोळी, सर्व नगरसेवक, नगरसेविका, उरण नगरपरिषद आरोग्य निरीक्षक महेश लवटे व कर्मचारी अधिकारी विविध उपाययोजना करीत आहेत. तसेच ते कोरोनाच्या जनजागृतीसाठी मेहनत करीत आहेत त्यामुळे उरण नगरपरिषदेला सहकार्य करा, नगर परिषद नेहमीच नागरिकांना सहकार्य करेल असे त्यांनी म्हटले आहे.