Breaking News

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरीच राहून साजरी करा’

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही घरामध्येच साजरी करावी, असे आवाहन पनवेल महापालिकेचे नगरसेवक तथा भाजप रायगड जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश बिनेदार आणि भाजपचे रायगड जिल्हा परिषद प्रतोद व अनुसूचित जाती मोर्चाचे सरचिटणीस अमित जाधव यांनी केले आहे.

प्रकाश बिनेदार व अमित जाधव यांनी म्हटले आहेे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी आपण उत्साहात साजरी करतो, पण सध्या देशावर आलेल्या कोरोना या जीवघेण्या रोगाचे संकट पाहता आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने संपूर्ण देश लॉकडॉऊनमध्ये आहे.

आमची सर्व भीमसैनिकांना विनंती आहे की, यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण सर्वांनी आपल्या घरीच राहून साजरी करावयाची आहे. बौद्धविहारामध्ये न जाता आपल्या घरामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व बुद्धवंदना घेऊन वंदन करावे आणि देशहितामध्ये सहकार्य करावे.

Check Also

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य मूट कोर्टचे बुधवारी उद्घाटन

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोहळा पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक …

Leave a Reply