Breaking News

पंतप्रधान मोदी आज काय बोलणार? देशाला उत्सुकता

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (दि. 14) सकाळी 10 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. कदाचित ते लॉकडाऊन वाढवत असल्याची घोषणा करू शकतात. काही राज्यांनी यापूर्वीच लॉकडाऊन वाढवले असले तरी अन्य बहुतांश राज्ये अजूनही केंद्राच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. शिवाय रेल्वे, विमान अशा विविध सेवा केंद्राच्या अखत्यारित असल्यामुळे पंतप्रधान मोदी काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. राज्यांनी लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक त्रुटी राहत असल्यानेच राष्ट्रीय लॉकडाऊन 24 मार्च रोजी जाहीर करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरण म्हणजेच एनडीएमएकडून हे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. यात वाढ केली जाऊ शकते. याव्यतिरिक्त मोदी काय बोलतात हेही महत्त्वपूर्ण असेल.

Check Also

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो …

Leave a Reply