पनवेल : रामप्रहर वृत्त
कोणताही आपत्कालीन प्रसंग असो लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गरजूंना नेहमीच मदत केली आहे. त्याच अनुषंगाने कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन परिस्थिती पाहता गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंची मदत व्हावी, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृहनेते परेश ठाकूर यांच्याकडून दोन हजार कुटुंबांना मदत होईल अशा जीवनावश्यक वस्तूंची पॅकेट्स तहसील कार्यालयास सुपूर्द करून शासनाच्याही उपक्रमात मदत करण्यात आली.
या पॅकेटमध्ये तांदूळ, डाळ, तेल, कांदे, बटाटे आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. कोरोना व लॉकडाऊनमुळे पनवेल परिसरातील गोरगरिब लोक उपाशी राहू नयेत यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गरीब, गरजूंना मदतकार्य केले. पनवेल परिसरातील अनेक विभागात गोरगरिबांना ही मदत पोहोचविण्यात आली. त्याच अनुषंगाने तहसील कार्यातून होणार्या मदतकार्यात हातभार लागावा, यासाठी ठाकूर कुटुंबीयांच्या वतीने मदत करण्यात आली.
महापूर असो किंवा अन्य कोणती आपत्ती दानशूर व्यक्तिमत्व असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सामाजिक भावनेतून मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. स्वतः लोकांच्या मदतीला धावून जाणे हा त्यांचा पिंड आहे. लोकांवरील प्रसंग म्हणजेच आपल्यावर प्रसंग आहे अशी भावना ठेवून ते काम करतात. कोरोनामुळे लॉकडाऊनची परिस्थिती आली आहे, मात्र पनवेल क्षेत्रात कुणीही उपाशी राहू नये, यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर जातीने लक्ष देत आहेत. त्यांच्या या मदतकार्यातून हजारो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.
Check Also
कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा
कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …