Breaking News

उरण भारतीय जनता पक्षातर्फे सावरखार येथे कापडी पिशव्यांचे वाटप

उरण : वार्ताहर

देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष उरण यांच्या वतीने सेवा सप्ताहाचे औचित्य साधून रविवारी (दि. 20)  आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप उरण तालुका उपाध्यक्षा निर्मला प्रभाकर घरत यांच्या हस्ते उरण तालुक्यातील सावरखार येथील महिलांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

ज्या महिलांना नेत्र तपासणीसाठी शिबिरात जाण्यास वेळ मिळाला नाही अशा महिलांना या शिबिरातून कुपन देण्यात आले. त्या महिलांना 30 सप्टेंबरपर्यंत डोळे तपासले जातील अशाप्रकारे कुपन दिले. प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा आणि कापडी पिशव्यांचा वापर करा, असे मार्गदर्शन भाजप उरण तालुका उपाध्यक्षा निर्मला प्रभाकर घरत (सावरखार) यांनी महिलांना केले.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply