सुधागडात कृषी विभागाचा उपक्रम
पाली ः प्रतिनिधी
लॉकडाऊनमुळे आंबा बागायतदार शेतकरी फळाची विक्री करू शकत नाही आणि खवय्येदेखील हापूसपासून वंचित राहत आहेत. अशा वेळी शेतकर्यांकडून थेट ग्राहकांपर्यंत हापूस पोहोचविण्याचे काम सुधागड तालुका कृषी विभागाने करून दिलासा दिला आहे.
आंबा बागायतदार शेतकर्यांकडून थेट ग्राहकांना फळविक्री करून सामाजिक बांधिलकी जपावी असे सुधागड येथील ओसवाल प्लाझा सोसायटीने ठरविले. त्यानुसार कृषी सहाय्यक अनिकेत परबत व ओसवाल प्लाझा सोसायटीचे सदस्य मिलिंद देशमुख यांनी आंबा वितरण करण्याची जबाबदारी घेतली. कृषी विभागाने त्यासाठी परवानगी दिली आणि सोसायटीत दोनशे पेट्यांची म्हणजे तब्बल 400 डझन हापूस आंब्यांची विक्री केली गेली. अशा प्रकारे लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना घरपोच आंबा मिळाला, तर शेतकर्यांचेही अर्थाजन झाले, असे ओसवाल प्लाझाचे सदस्य सुशील शिंदे यांनी सांगितले.