Breaking News

कळंबोली लोह पोलाद बाजारातीत गाळ्याला आग

कागदपत्रांसह इलेक्ट्रिक वस्तू जळून खाक

पनवेल ः वार्ताहर

कळंबोली लोह पोलाद बाजाराच्या इमारतीमधील गाळ्याला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. तेथील कागदपत्रे त्याचबरोबर दोन संगणक, दोन प्रिंटर, दोन झेरॉक्स मशीन, सहा लॅपटॉप जळून खाक झाले. आग विझवण्यासाठी कळंबोली येथील अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले. मात्र आतमध्ये जाण्यासाठी जागा नसल्याने वेळेत आग विझवता आली नाही, अशी माहिती अग्निशमनच्या अधिकार्‍यांनी दिली.

कळंबोली स्टील मार्केटमधील फॅसिलिटी सेंटर समोरील रस्ता बाजार समितीने बंद केला आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहनांना ये-जा करता येत नाही. या ठिकाणी आग लागली असताना अग्निशमन बंबाला येथे येण्यासाठी अनेक अडथळे पार करावे लागले. या आगीत गाळ्यामधील कागदपत्रे त्याचबरोबर दोन संगणक, दोन प्रिंटर, दोन झेरॉक्स मशीन, सहा लॅपटॉप जळून खाक झाले.

रस्ता बंद असल्याने घटनास्थळी पोहण्यास अडचण

आशिया खंडातील सर्वात मोठे लोह पोलाद मार्केट हे असून याठिकाणी सिडकोने फॅसिलिटी सेंटर बांधले. या सेंटरच्या समोरील रस्ता सिमेंटचे ब्लॉक लावून गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अग्निशमन दलाचे बंब वेळेत त्याठिकाणी पोहण्यास अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply