खालापूर ः प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर (एक्स्प्रेस वे) वाहने पेटण्याचे सत्र सुरूच असून, रविवारी (दि. 13) खालापूर टोलनाक्यावर उभ्या कारला अचानक आग लागून ती जळून खाक झाली. या घटनेत पती-पत्नी बालंबाल बचावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार सलीम खानेवाला (वय 47) व त्यांची पत्नी आजम (वय 39, रा. मिरा रोड, मुंबई) हे आपल्या डस्टर कार (एमएच 03-सीडब्ल्यू 0250)ने रविवारी मिरारोड ते लोणावळा असा प्रवास करीत होते. दुपारी 2.40च्या सुमारास खालापूर टोलनाक्यावर ते टोल भरण्यासाठी थांबले असताना त्यांच्या कारमधून अचानक धूर निघू लागला आणि बघता बघता या कारने पेट घेतला. ते लक्षात येताच सलीम हे पत्नीसह लगेचच गाडीतून उतरले. या वेळी टोलनाक्यावरील यंत्रणा, वाहतूक पोलीस मदतीसाठी धावले, मात्र आगीचा भडका वाढत जाऊन कार जळून खाक झाली.
दरम्यान, एक्स्प्रेस वेवर वाहने पेटण्याच्या तीन दिवसांत तीन घटना घडल्या आहेत.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …