Breaking News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील शेतकर्यांनी घ्यावयाची खबरदारी…

* कोरोना विषाणूचा संसर्ग प्रतिबंधित करण्यासाठी शेतीतील कामे करताना स्वच्छता व सुरक्षिततेच्या खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करावे.

* शेतीतील सर्व कामे करताना शेतकर्‍यांनी, शेतमजुरांनी तोंडाला मास्क लावावे तसेच एकमेकांमध्ये चार ते सहा फुट अंतर राहील याची दक्षता घ्यावी. ठराविक वेळाने साबणाने हात स्वच्छ धुवावेत.

* जेवताना विश्रांती घेताना, शेतमाल गाडीत चढवत तसेच उतरवत असताना दोन व्यक्तींमध्ये चार ते सहा फुट अंतर राहील असे पहावे. शेतात काम करताना कामगारांनी जास्त गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.

* शेतीमध्ये यंत्राचा वापर केल्यास यंत्रे, शेतमाल साठवून ठेवायच्या गोण्या व इतर साहित्य वापरण्यापूर्वी निर्जंतुक करून घेणे आवश्यक आहे. यंत्राचा वापर झाल्यानंतरही निर्जंतुक करून ठेवावे.

* पिक संरक्षण व पोषक अन्नद्रव्यासंदर्भात फवारणी करताना उपकरणे हाताळणे, द्रावण तयार करणे, फवारणी करणे व उपकरणे धुवून ठेवणे याविषयी पुरेशी खबरदारी घ्यावी.

* शेतीसाठी आवश्यक खरेदी आणि विक्री करताना शासनाने नेमून दिलेल्या नियमांचे पालन करावे.

आंबा फळधारणा अवस्था

* आर्द्रतेत होणारी घट व तापमानात होणार्‍या वाढीमुळे काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची ‘नूतन’ झेल्याच्या सहाय्याने चौदा आणे (80 ते 85 टक्के) पक्वतेला देठासही सकाळी 10 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी 4 नंतर काढणी करावी. उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने आंब्याची फळे काढल्यानंतर सावलीमध्ये ठेवावीत तसेच आंबा फळांची वाहतूक रात्रीच्या वेळेस करावी. फळे काढणीच्या किमान आठ दिवस अगोदर झाडावर कोणतेही फवारणी करू नये तसेच फळे काढणीस तयार होण्याच्या एक महिना अगोदर झाडास पाणी देण्याचे बंद करावे.

* आंब्यावरील काढणीपश्चात बुरशीजन्य रोगापासून आंबा फळांचे संरक्षण करण्यासाठी काढणीनंतर लगेचच फळे 520 सें. तापमानाच्या पाण्यात 10 मिनिटे बुडवून काढावीत व नंतर फळे पिकविण्यासाठी ठेवावीत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या कोरोगोटेड फायबर बॉक्समध्ये फळे पॅकिंग करावीत.

* दि. 17 एप्रिल 2020 दरम्यान हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने आंबा फळांचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी आंबा फळांना कागदी-वर्तमानपत्रापासून बनविलेल्या पिशव्यांचे आवरण घालावे.

* ढगाळ पावसाळी वातावरण असल्यामुळे आंबा फळांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझीम 12 टक्के ़मॅन्कोझेंब 63 टक्के 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

* आंबा फळांचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी विद्यापीठाने शिफारस केलेले ‘रक्षक फळमाशी सापळा’ प्रती हेक्टरी 4 या प्रमाणात बागेमध्ये झाडाच्या खालील बाजूच्या फांद्यावर टांगून ठेवावेत. फळगळ झालेली आंबा फळे गोळा करून नष्ट करावी व बागेत स्वच्छता ठेवावी.

* तापमान आणि आर्द्रतेत होणार्‍या बदलामुळे फळधारणा झालेल्या आंबा बागेमध्ये अंडाकृती अवस्थेत असलेल्या फळांची गळ होण्याची शक्यता असल्याने फळगळ कमी करण्यासाठी, पाण्याच्या उपलब्धतेनुसार 150 ते 200 लिटर पाणी प्रती झाडास 15 दिवसांच्या अंतराने देण्यात यावे.

* नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना पहिली तीन वर्षे पाणी देण्याची व्यवस्था करावी. पहिल्या वर्षी आठवड्यातून दोनवेळा तर दुसर्‍या वर्षी पंधरा दिवसातून दोनवेळा व तिसर्‍या वर्षी महिन्यातून दोनवेळा प्रत्येक कलमांना 30 लिटर पाणी देण्याची व्यवस्था करावी.

* आंबा नवीन लागवड करावयाच्या क्षेत्रामध्ये साफसफाई करून घ्यावी.

(क्रमश:)

-डॉ. मनोज तलाठी, कार्यक्रम समन्वयक,  कृषी विज्ञान केंद्र, कल्ला-रोहामार्फत शेतकर्‍यांना कृषीविषयक सल्ला

Check Also

उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!

पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …

Leave a Reply