नवी मुंबई : प्रतिनिधी
वाशी येथील एकवी एअर ऑर्गनायझेशन प्रा. लि. या पायलटचे प्रशिक्षण देणार्या कंपनीचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 22) आमदार मंदाताई म्हात्रे आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते, तर कार्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री व विद्यमान आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास अॅड. पी. सी. पाटील, ऑर्गनायझेशनचे मार्केटिंग मॅनेजर कॅप्टन विजय भावे, कॅप्टन पृथ्वीश, कॅप्टन मिथाली, दीपक म्हात्रे आदी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत संचालक कॅप्टन सचिन भाने यांनी केले.
एकवी एअर ट्रेनिंग ऑर्गनायझेशनमध्ये एवीएशन विश्वातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्व प्रकारचे अभ्यासक्रम एकाच ठिकाणी शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना लाभणार आहे. पनवेल तालुक्यात आकारात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी लक्षात घेता एकवी आर्गनायझेशनकडून विविध प्रकारचे कौशल्य व पायलट प्रशिक्षणाची आवश्यक माहिती पुरवणारे सर्व अभ्यासक्रम संस्थेत शिकवण्याची व्यवस्था होणार आहे. त्यासाठी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
Check Also
रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …