उरण : वार्ताहर – अॅड. निग्रेश पाटील आणि मित्र परिवारच्या वतीने उरण येथील जांभुळपाडा आदिवासी वाडी, विंधणे आदिवासी वाडी, कंठवली आदिवासी वाडी आणि कंठवली गाव अशा चार ठिकाणी बुधवारी (दि.15) आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.
उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे आणि 95 गाव गावठाण विस्तार संघटनेचे अध्यक्ष अॅड. सुरेश ठाकूर तसेच पनवेल वकील संघटनेचे माजी अध्यक्ष अॅड.मदन गोवारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लालबागचा राजा अध्यक्ष जगदीश ठाकुर, बॅड बॉइजचे अध्यक्ष प्रमोद मढवी आणि प्राणीमित्र आनंद मढवी, सानिया ट्रान्सपोर्टचे निर्दोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर झाले.
या शिबिरासाठी डॉक्टर म्हणून आरोग्य सेवक स्वप्निल पाटील, आरोग्य सेवक त्रिभुवन गेडाम, आरोग्य सेविका रसिका गावंड यांचे सहकार्य लाभले होते. शिबिरात 1100 लोकांनी तपासणी करून घेतली. तपासणीसाठी डॉक्टर स्वप्नील पाटील व सहकारी तसेच आई मेडिकल चिरलेचे मालक संदीप पाटील आणि मित मेडिकल विंधणेचे मालक बळीराम पेणकर यांनी सहकार्य केले.
या वेळी जांभुळपाडाचे प्रभाकर पाटील, शरद घरत, अजिंक्य पाटील, दिघोडेचे रमण कासकर, सुनील ठाकूर लक्ष्मण पाटील, सानिया ट्रान्सपोर्टचे निलेश पाटील, पॉवर जिमचे रुपेश ठाकूर, स्थानिक प्रकल्पग्रस्त राज पाटील, शिवक्रांती
मावळा अध्यक्ष किरण केणी, समाजसेवक अंकुश भगत आदी उपस्थित होते.