Breaking News

स्वाती गावंड आणि प्रणिता म्हात्रे यांचे अभिनंदन

पनवेल ः पनवेल तालुक्यातील आवरे-पाले ग्रुपग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत स्वाती गावंड आणि प्रणिता म्हात्रे सदस्यपदी निवडून आल्यानिमित्त नवनिर्वाचित सदस्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी आवरे गाव अध्यक्ष संतोष गावंड, युवा नेते सनी म्हात्रे, उपाध्यक्ष सोपान गावंड, उपसरपंच हरेश म्हात्रे, चेतन गावंड, मितेश गावंड, शेतकरी समिती अध्यक्ष देवीदास म्हात्रे आदी उपस्थित होते.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply