Breaking News

चिरनेर, मोहोपाडा येथे आज भाजपत ’मेगाभरती’

उरण ः रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांची रीघ लागली असून, शुक्रवारी (दि. 9) चिरनेर व मोहोपाड्यामध्ये भाजप कार्यकर्ता मेळाव्यात पक्षप्रवेशाची मेगाभरती होणार आहे. पालकमंत्री रवींद्र

चव्हाण तसेच माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत हा भाजप प्रवेश होणार असल्याने भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चिरनेर येथील पी. पी. खारपाटील हायस्कूलच्या प्रांगणात शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. शेकाप, काँग्रेस व शिवसेनेतील अनेक नेते, कार्यकर्त्यांचा व पदाधिकार्‍यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश होणार आहे. सायंकाळी 6 वाजता मोहोपाडा येथील जनता विद्यालयात मेळावा व पक्षप्रवेश कार्यक्रम होणार आहे.

या वेळी सिडको अध्यक्ष, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजप नेते महेश बालदी, माजी आमदार देवेंद्र साटम, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, खालापूर तालुकाध्यक्ष बापू घारे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्याने व पक्षप्रवेश सोहळ्यामुळे भाजपत उत्साह आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर ‌‘रयत‌’चे ऋण फेडणारे आधुनिक एकलव्य -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणजे विकासाचे कणखर नेतृत्व ः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पनवेल ः रामप्रहर …

Leave a Reply