मुरूड ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी असलेल्या लॉकडाऊनमुळे मुरूड एसटी आगारदेखील महिनाभरापासून बंद आहे. या बंदच्या काळात गाड्यांच्या मेंटेनन्सचा प्रमुख प्रश्न उद्भवतो. जर गाडी चार दिवस बंद ठेवली तर बॅटरी उतरण्याची शक्यता असते व गाडी महिनाभर चालूच केली नाही तर बॅटरी नादुरुस्त होते. तसेच इंजीनमधील ऑइल घट्ट होऊन वाहन नादुरुस्त होते. त्यामुळे मुरूड आगारातील तीन टक्के कामगार सध्या आगारात येऊन प्रत्यक्ष गाडी चालू करतात व बॅटरी चार्ज तसेच आलटून पालटून सर्व गाड्यांच्या दुरुस्तीचे काम सातत्याने सुरू आहे. ज्या दिवशी लॉकडाऊन संपेल त्या दिवशी प्रवाशांना गाड्या सुसज्ज मिळतील.
Check Also
पनवेलमध्ये शुक्रवारपासून राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी
राज्यातून निवडलेल्या 25 उत्कृष्ट एकांकिका होणार सादर पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास …