Breaking News

चौक पोलिसांची गांधीगिरी: दुचाकीस्वारांत घबराट

खोपोली : प्रतिनिधी

लॉकडाऊनमध्ये नागरिकांना वारंवार घरातच राहण्याचे आवाहन करूनही  विनाकारण दुचाकीवरून फिरणार्‍यांना सोमवारी चौक पोलिसांनी ताब्यात घेतले. चौक बाजारपेठेत विनाकारण फिरणार्‍यांची संख्या वाढत आहे. चौक पोलिसांनी बाजारपेठेबाहेर बाजारात खरेदीसाठी येणार्‍या बाइक व फोर

व्हीलरची पार्किंगची व्यवस्था केली आहे. तरीही काहींचे बाजारात बाइक घेऊन फिरणे सुरूच होते.

व्यापारी असोसिएशनने जनता कर्फ्यू करून बाजाराची वेळ नक्की केली आहे. तरीही नागरिकांच्या वावरावर बंधने येत नाहीत. परिणामी सोमवारी पोलिसांनी धडक कारवाई केल्यानंतर विनाकारण फिरणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली, त्या दुचाकीस्वारांना त्यांच्या घरी सोडून पोलिसांनी गांधीगिरी केली. चौकचे सपोनि. संजय बांगर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply