Breaking News

‘नाका कामगारांना आर्थिक मदत करावी’

खोपोली ः प्रतिनिधी

कोरोनाने महाराष्ट्रात शिरकाव केल्यावर नागरिकांत संसर्ग पसरू नये यासाठी राज्यात टाळेबंदी केल्यामुळे सर्व उद्योगधंदे बंद आहेत. परिणामी नाका कामगारांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी, असे निवेदन श्रमिक कला कौशल्य विकास बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी तहसीलदारांकडे दिले आहे.

खोपोलीत शहर झपाट्याने वाढत असल्याने अनेक ठिकाणांहून नाका व वेठबिगार कामगार रोजगारासाठी येथे आले आहेत. दररोज मिळेल त्या ठिकाणी काम करून संध्याकाळी मिळणार्‍या पैशांतून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, मात्र टाळेबंदीमुळे नाका कामगारांच्या हातचे काम गेल्यामुळे घरभाडे, वीजबिल, गॅस सिलिंडर, किराना सामान आदी खर्चासाठी पैसे नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे  सुभाष गायकवाड यांंच्यासह पदाधिकार्‍यांनी तहसीलदारांकडे आर्थिक मदतीसाठी निवेदन पत्र सादर केले आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply