Breaking News

परप्रांतीय विक्रेत्यांकडून वडघर पुलावरुन कचरा खाडीत

पनवेल : वार्ताहर

सध्याच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय पनवेल शहर परिसरात मोक्याच्या जागा पकडून तसेच हातगाडीवर फळे व भाजी विक्रेते धंदा करीत आहेत. वडघर पुल व परिसरात मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे परप्रांतीय विक्रेते धंदे करीत असून त्यांच्याकडे साठणारा माल, कचरा आदी एकत्र करून ते बिनधास्तपणे वडघर पुलावरुन खाली खाडीत टाकत आहेत. त्यामुळे खाडीचे पाणीचे दुषित होत असून यातून अजून संसर्ग वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. अनेक प्रकारचे व्यापारी वडघर पुलाच्या दोन्ही बाजूस फळे व भाजी विक्रीसाठी आले आहेत. हे सर्व व्यापारी परप्रांतीय आहेत. कुठल्याही प्रकारे नागरिकांच्या आरोग्याची काळजी न घेता उघड्या रस्त्यावर तोंडाला मास्क किंवा हातात ग्लोज न घालता ते फळ व भाजी विक्री करीत आहेत. यातून पनवेल शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता असल्याने संबंधित प्रशासनाने तातडीने या बाबीकडे लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी पनवेलकरांकडून होत आहे.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply