Breaking News

दहावीतही कोकण सरस; राज्यात एकूण निकाल 93.83 टक्के

पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2023मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी (दि. 2) जाहीर करण्यात आला. राज्याचा एकूण निकाल 93.83 टक्के लागला असून बारावीप्रमाणे दहावीतही कोकणाने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत नऊ विभागीय मंडळांमध्ये अव्वलस्थान (98.11 टक्के) पटकाविले आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15 लाख 41 हजार 666 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 लाख 29 हजार 96 विद्यार्थी प्रविष्ट झाले, तर 14 लाख 34 हजार 898 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व विभागीय मंडळातून नियमित उत्तीर्ण मुलींची टक्केवारी 95.87 इतकी असून मुलांची टक्केवारी 92.05 इतकी आहे. याचाच अर्थ मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 3.82 टक्क्यांनी जास्त आहे.
दहावीच्या एकूण 25 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे, तर 23 हजार 13 शाळांपैकी 6,844 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. नियमित विद्यार्थ्यांपैकी चार लाख 89 हजार 455 विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत, तर पाच लाख 26 हजार 210 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
तालुकानिहाय टक्केवारी
माणगाव 96.87, पनवेल 96.53, पोलापूर 96.02, म्हसळा 95.92, महाड 95.88, अलिबाग 95.30, श्रीवर्धन 95.08, उरण 94.73, रोहा 94.53, पेण 93.90, कर्जत 93.73, तळा 97.15, सुधागड 93.37, मुरूड 92.88, खालापूर 92.49.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply