पनवेल : कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून राज्यात 21 एप्रिलपर्यंत 60 हजार 5 जणांवर गुन्हे दाखल झाले असून, 2 कोटी 30 लाख 20 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. या काळात 121 पोलिसांवर हल्ला केल्याने 411 जणांना अटक करण्यात आली आहे. यात रायगड जिल्ह्यातील दोन घटनांचा समावेश असून, तीन जणांना अटक करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबईत एक घटना घडली अनधिकृत प्रवासी वाहतूकप्रकरणी 1 हजार 62 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर रस्त्यावर वाहने आणल्याबद्दल 41 हजार 768 वाहने जप्त करण्यात आली आहेत. कायदा मोडल्याने कलम 188खाली झालेल्या कारवाईत रायगडातील 143 आणि नवी मुंबईतील 506 जणांचा समावेश आहे.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …