Breaking News

लॉकडाऊनकाळात गरजूंना जेवण

मुंबई : प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. यामुळे हातावर पोट असणारे व्यक्ती, मजूर, आदिवासी बांधव यांच्यावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीत त्यांना मायेचा घास मिळावा व संकटसमयी कोणीही उपाशी राहू नये या हेतूने अजय टाटनवा यांनी स्वखर्चाने त्यांना जेवण दिले आहे. अजय टाटनवा यांनी सांगितले की, दररोज 200 ते 500 नागरिकांना जेवण देण्याचे काम केले जाते. यामध्ये मालवणी मालाड, अंधेरी, वरळी या ठिकाणी असणार्‍या गरजूंना दररोज पोटभर जेवण दिले जाते.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply