Breaking News

पनवेलमध्ये रस्त्यांवरील झाडाझुडपांची सफाई

नगरसेवक विक्रांत पाटील यांची तत्परता

पनवेल : वार्ताहर

पनवेल शहरातील अमरधाम ते वीर सावरकर चौक या रस्त्यावरील वाढलेल्या झाडाझुडपांमुळे होणारा कचरा साफ करून घेण्यात आला. नगरसेवक विक्रांत पाटील यांनी स्वत: उपस्थित राहून ही साफ सफाई करवून घेतली. यामुळे परिसरातील नागरिक पाटील यांना धन्यवाद देत आहेत.

पनवेल शहरातील अमरधाम ते वीर सावरकर चौक या रस्त्यावरील ओपन प्लॉटवर बरीच झाडेझुडपे वाढली होती. त्यामुळे डास, किडे यांचा प्रादुर्भाव वाढला होता आणि सोसायटीमध्ये साप येणे अशा गोष्टी वारंवार होऊ लागल्या होत्या. परिसरातील रहिवाशांनी ही समस्या प्रभागातील कार्यक्षम नगरसेवक तथा मा. उपमहापौर विक्रांत पाटील यांची भेट घेऊन सांगितली. दुसर्‍या दिवशी विक्रांत पाटील यांनी जेसीबी मागवून व प्रत्यक्ष उपस्थित राहून पूर्ण झाडेझुडपे साफ सफाई करून घेतली.

प्रभागातील समस्यांचे तत्परतेने निरसन करणारा नगरसेवक लाभल्याबद्दल नागरीकांनी समाधान व्यक्त केले. या वेळी  विक्रांत पाटील यांनी प्रभागातील नागरिकांना आव्हान केले की, त्यांनी आपल्या कोणत्याही समस्या अथवा सूचना यासाठी केव्हाही हक्काने 9167042666 या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा. त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी त्वरित प्रयत्न केले जातील.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply