खारघरमधील रस्ता झाला दुरूस्त
खारघर ः रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग 5 मधील सेक्टर 7 हिरानंदानी सिग्नल परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने प्रवाशांना त्रास होत होता. यासाठी नगरसेवक शत्रुघ्न अंबाजी काकडे प्रयत्नशील होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून रविवारी त्यांनी सिडको अधिकार्यांना घेऊन हे काम करून घेतले.
महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग 5 मधील सेक्टर 7 हिरानंदानी सिग्नलचा परिसर हा अतिशय रहदारीचा मार्ग म्हणून ओळखला जातो. मात्र हा मुख्य रस्ता पावसाळ्यात खराब झाल्याने वाहतुकीस त्रास होत असे. शिवाय नेहमीच वर्दळीचा मार्ग असल्याने रस्त्याचे डांबरीकरण करण्यास अडथळा येत होता. गेले अनेक दिवस या रस्त्याच्या दुरूस्ती कामासाठी नगरसेवक शत्रुघ्न अंबाजी काकडे प्रयत्नशील होते. त्यासाठी अनेक विनंती अर्ज व प्रत्यक्ष सिडको अधिकार्यांची भेट घेतली होती. अखेर सिडको अधिकार्यांना सोबत घेऊन त्यांनी हे काम करून घेतले. याबद्दल नागरिकांनी व वाहनचालकांनी त्यांचे आभार मानले.