Breaking News

मुरूडमध्ये गुन्ह्यांची आकडेवारी शून्यावर

मुरूड ः प्रतिनिधी

कोरोना विषाणूचा प्रसार वाढल्याने सर्वत्र लॉकडाऊन जारी केल्यामुळे मुरूड पोलीस ठाणे हद्दीतीत गुन्ह्यांची नोंद शून्यावर आली आहे, मात्र गुन्हेगारी कमी झाली असली तरी कोरोनामुळे प्रत्यक्ष घरातील कुटुंब प्रमुखाला बाहेर जाण्यास मज्जाव करताना पोलिसांना कठोरपणे वागावे लागत आहे. याचा पोलिसांवर ताण असतो. नाक्यानाक्यावर उभे असणारे पोलीस वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करतात, पण जनसामान्यांचे पोलिसांबद्दलचे मत खराब होते. मुरूड शहरात पोलीस व पालिकेच्या खबरदारीमुळे एकही कोरोना रुग्ण सापडला नाही. संचारबंदी काळात मोबाइल चोरी, हाणामारी, मौल्यवान वस्तूंची चोरी, फसवणूक, विनयभंग अशा गुन्ह्यांची एकही नोंद झाली नाही. सर्वच दुकाने बंद असल्याने व माणसे घरातच राहत असल्याने या गुन्ह्यांना आळा बसला आहे. बाजारात गर्दी होत नसल्याने मौल्यवान वस्तू हरवण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. 21 मार्चपासून रिक्षा, मिनीडोर, एसटी मंडळाच्या गाड्या रद्द झाल्याने वाहतूक पूर्णतः बंद असल्याने रस्त्यावरील अपघात कमी झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस काळजी घेत आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नियोजनबद्ध व्यवस्था केली आहे. तरीही बाजारात खरेदीसाठी लोक गर्दी करून पोलिसांचा रोषाला बळी पडतात.

वाहनचालकांवर गुन्हा दाखल

पेण ः प्रतिनिधी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांचे वाहनबंदीचे आदेश असतानाही वाहन चालविल्याप्रकरणी पेणमध्ये दुचाकीस्वार व वडखळ येथे कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेण पोलीस ठाणे हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता उपाययोजना सुरू असून सोमवारी (दि. 20) सकाळी 10. 30 वाजता एक इसम आपल्या ताब्यातील अ‍ॅक्टिवावरून सतत फिरत असताना पोलिसांनी पकडले. त्याला दुचाकीचा वापर न करण्याची सूचना देऊनसुध्दा त्याने दुचाकीचा वापर करून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी त्याच्यावर पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसर्‍या घटनेत वडखळ पोलीस ठाणे हद्दीत वाहनबंदीचे आदेश असतानाही कार चालविल्याप्रकरणी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply