Breaking News

लॉकडाऊनमुळे माठविक्रेतेही संकटात; वाढत्या कोरोनामुळे ग्राहकांची खरेदीकडे पाठ

उरण : वार्ताहर

दरवर्षी उन्हाळ्याची चाहूललागताच गार पाण्यासाठी गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणार्‍या माठाची मागणी वाढते. यामुळे माठ विक्री व्यावसायिकांना यंदाच्या वर्षी तरी काहिसा दिलासा मिळणार असल्याचे चित्र सुरुवातीला दिसत होते, मात्र कोरोनाच्या दुसर्‍या टप्प्यामुळे माठ खरेदी करण्यास कोणीही येत नसल्याने गरिबांचा फ्रीज ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहे. एप्रिल महिना सुरू झाला तरीही माठ विकले न गेल्याने कुंभार समाजाचे मोठे आर्थिक नुकसान झाले, त्यामुळे राज्य सरकारकडून मदत मिळावी, असे उरण तालुक्यातील मुलेखंड कुंभारवाडा येथील सुरेखा कुंभार यांनी सांगितले. मागच्या वर्षी उन्हाळ्याचा हंगाम सुरू होताच कोरोनामुळे लॉकडाऊन लागले इतर व्यवसायांप्रमाणे कुंभार व्यवसायही अडचणीत आला. यावर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला माठ विक्री सुरू झाली असतानाच लोक फ्रीजचे पाणीपिण्या ऐवजी माठातील पाण्याला अधिक पसंती देताना दिसून येत होते, परंतु पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्याने ग्राहक घराच्या बाहेर पडत नसल्याने कुंभार व्यवसाय अडचणीत येतो की काय? अशी अवस्था निर्माण झाली आहे. माठ बनविण्यासाठी लागणार्‍या मातीच्या दरामध्ये यंदा वाढ झाली. भूशाच्या किंमतीही वाढ आली. असल्याने यंदा एका माठाच्या किंमतीत 20 ते 40 रुपयांची वाढ करण्यात आली असल्याचे माठ व्यवसाईकांनी सांगितले. सध्या मोठ्या प्रमाणात नळ असलेल्या माठांना ग्राहक पसंती देत आहेत. पुन्हा कोरोनाने उन्हाळाच्या प्रारंभी डोके वर काढले पुन्हा लॉक डाऊन झाला तर व्यवसाय होईल की नाही? याची चिंता सतावत आहे. मागच्या वर्षी उन्हाळ्यात माती आणि भुसा मोठ्या प्रमाणात खरेदी करून माठ बनवले, मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. यामुळे सर्वच जण घरात बसून असल्याने माठाकडे पाठ फिरवली. याचा फटका पारंपरिक कुंभार व्यावसायिकांनाही बसला. यंदा तरी मागील वर्षी केलेला खर्च निघेल आणि दोन पैसे मिळतील, हीच अपेक्षा व्यावसायिक व्यक्त करत आहे. पुन्हा लॉकडाऊन झाला, तर व्यवसाय होईल की नाही याची चिंता सतावत आहे. उन्हाळ्यात माती आणि भुसा मोठ्या प्रमाणात खरेदी करून माठ बनवले, मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. यामुळे सर्वच घरात बसून असल्याने माठाकडे  पाठ फिरवली.

यंदा कोरोनामुळे नागरिक बाजारात येत नाहीत अथवा घरा बाहेर कमी पडतात. त्यामुळे माठ विकले जात नाहीत लहान माठ 200 ते 400 रुपये, तर नळ असलेले माठ 300 ते 350 रुपयास विकतो. यंदा माठांची विक्रीच होत नसल्याने आर्थिक नुकसान होत आहे. राज्य शासनाकडून आम्हाला मदतीची अपेक्षा आहे.

-गस्सू राऊत, माठ विक्रेता

फ्रीजमधील पाणी हे आरोग्याला हानीकारक आहे, तसेच विजेचे बिल येते. त्यामुळे आम्ही कुटुंबीय माठातील पाणी पितो आरोग्याला चांगले पाणी असल्याने दरवर्षी उन्हाळ्यात नवे माठ घेऊन पाणी पीत असतो, परंतु लॉकडाऊनमुळे बाहेर जाणे टाळतो.

-दिलीप जाधव, ग्राहक, उरण

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply