नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ’भारतरत्न’ गुरुवारी (दि. 8) प्रदान करण्यात आला आहे. राष्ट्रपती भवन येथे एका विशेष समारंभाचे आयोजन करून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सर्वोच्च नागरी सन्मानाचे वितरण करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी या पुरस्कारांची घोषणा केली होती.
या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अनेक मंत्री, नेते उपस्थित होते.