पेण : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त पेण तालुका व शहर भाजपच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या वेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले, तसेच उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून अटलजींच्या कार्याच्या स्मृतींना उजाळा दिला. भाजपचे तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, नगर परिषदेतील गटनेते अनिरुद्ध पाटील, नगरसेवक राजा म्हात्रे, माजी बांधकाम सभापती प्रकाश पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते आनंद जाधव, शहर उपाध्यक्ष अजय क्षीरसागर, प्रमोद मंडलिक आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
रोजगार महाकुंभला पनवेलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पं. दीनदयाळ उपाध्याय …
RamPrahar – The Panvel Daily Paper