पनवेल : वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील युएसआर ग्रुपचे व ऊदानी फाऊंडेशन यांच्या वतीने पनवेल तालुक्यातील एक हजार शंभर गरीब, गरजू कष्टकरी कामगार, नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले असल्याची माहिती उदानी फाऊंडेशनच्या अध्यक्षा नेहा उदानी यांनी दिली आहे. पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांच्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत साडेसातशे जीवनावश्यक वस्तूंचे कीट तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
लॉकडाऊनमुळे अनेक जणांची उपासमार होत आहे. शासनाने लॉकडाऊन घोषित केल्यापासून ऊदानी फाऊंडेशन, कॉन्शियस सिटीझन फोरम, दत्त मंदिर नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने नेरूळ, सीबीडी येथे कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले. सुमारे 6000 जेवणाचे पॅकेट्स रोज या कीचनमधून नवी मुंबई मधील वाटसरूंना गोरगरिबांना रोज मोफत जेवण पूर्वीत आहेत. याव्यतिरिक्तही पनवेल तालुक्यातील अनेक गरजू गरीब कष्टकरी कामगार यांच्या हातचे काम गेल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने पनवेल तालुक्यातील कोपर, कुंडेवहाळ, मानघर करंजाडे, पेंदर, पैठाली, पापडीचा पाडा, ओवे गाव मुकरीची वाडी अशा गावांमध्ये ऊदानी फाऊंडेशन व यूएसआर ग्रुप नवी मुंबईच्या वतीने श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.