Breaking News

उरणमधील विजेच्या समस्या दूर करा : आमदार महेश बालदी

पनवेल : रामप्रहर वृत्त
उरण तालुक्यातील विजेच्या समस्यांसंदर्भात आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांसोबत उरण नगर परिषदेच्या सभागृहात गुरुवारी (दि. 6) बैठक झाली. या वेळी आमदार बालदी यांनी विजेच्या समस्या दूर करण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले.
5 ऑगस्ट रोजी झालेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने बहुतांश गावांमध्ये वीज नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणालाही मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे तसेच काही दिवसांवर येत असलेला गणेशोत्सव लक्षात घेऊन या काळात वीजपुरवठा नियमित करण्याबाबत आमदार महेश बालदी यांनी अधिकार्‍यांना सूचना केल्या.
या बैठकीस उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, मुख्य अभियंता चव्हाण, अधीक्षक अभियंता शुभांगी, कार्यकारी अभियंता राठोड, नगरसेवक कौशिक शहा, राजू ठाकूर, नंदू लांबे, मेघनाथ म्हात्रे, जितेंद्र घरत, सुनील पाटील, जसीन गॅस, मनोहर साहरिया आदी उपस्थित होते.

Check Also

नवीन पनवेल येथे भीम जयंती महोत्सव; गायक आनंद शिंदे यांचा बहारदार कार्यक्रम

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीचे …

Leave a Reply