उरण : वार्ताहर
उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पूर्वविभागात कोप्रोली, कळंबुसरे, पुनाडे गावात पूर्व विभाग भाजप कमिटी माध्यमातून नुकताच कोप्रोली गावातील गरीब गरजू तसेच निराधार महिला सुमारे 250 कुटुंबाना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
या वेळी भाजप चिरनेर विभाग अध्यक्ष शशि पाटील, कुलदीप नाईक, रूपेश पाटील, संदेश पाटील, पुनाडेचे दत्तराज म्हात्रे, सचिन गावंड, कल्पेश म्हात्रे, योगेश गावंड, सुनील पाटील, रॉकेश पाटील आदींनी वाटप केले.
– भाजपतर्फे मास्क व सॅनिटायझर
भाजप पूर्वविभाग अध्यक्ष शशी पाटील आणि कुलदीप नाईक यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य कोप्रोली डॉक्टर, नर्स, कर्मचारी वर्ग व वर्कर्स, आंगणवाडी सेविका, पाणी पुरवठा करणारे कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, सफाई कर्मचारी यांना भारतीय जनता पार्टी कोप्रोली मार्फत मास्क व सॅनीटायझर देण्यात आले. यावेळी कल्पेश म्हात्रे, प्रीतम म्हात्रे, सुदेश पाटील, विकी भाई, दत्तराज म्हात्रे, नवनाथ म्हात्रे आदी उपस्थित होते.