धाटाव : प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील कोलाडनाजीक पुई येथील डोलवहाळ धरणात पोहण्यासाठी गेलेल्या 21 वर्षीय पर्यटकाचा शुक्रवारी (दि. 10) बुडून मृत्यू झाला.
कोलाड पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद असिफ अब्दुल रहमान खान (वय 21, रा. तळेगाव, जि. पुणे) हा शुक्रवारी त्याची मावशी मोमीन खातून, मावस भाऊ एयाज खान व अय्यज खान, मावस बहीण बुशरा हाफीजूर रहमान खान (रा. धारावी, मुंबई) यांच्यासह डोलवहाल धरण व परिसर पर्यटनासाठी आले होते. त्या वेळी असिफ अब्दुल रहमान खान धरणाखालील नदीच्या पाण्यात पोहत असताना त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
घटनेचे वृत्त समजताच कोलाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पाण्यात शोध घेऊन बुडालेल्या तरुणास पाण्याबाहेर काढून दवाखान्यात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
Check Also
पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper