Breaking News

माथेरानमधील अश्वांना खाद्यवाटप; अश्वपालकांना दिलासा

माथेरान : रामप्रहर वृत्त

येथील वाहतुकीचे प्रमुुख साधन असलेल्या घोड्यांचे लॉकडाऊन काळात खाद्याअभावी हाल होऊ नयेत यासाठी माथेरानबाहेरील अनेक स्वयंसेवी संस्थांनी तसेच दानशूर व्यक्तींनी अश्वखाद्य पुरविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे अश्वपालकांना दिलासा मिळाला आहे. रायगड जिल्हा हर हर चांगभलं धनगर समाज संस्थेचे अध्यक्ष संतोष आखाडे यांनी अश्वखाद्य मिळावे यासाठी नवी मुंबई हॉर्स केअर्स ग्रुपच्या सदस्यांना विनंती केली होती. त्यानुसार अश्वखाद्य (भुसा) पाठविण्यात आले. त्याचा इंदिरा गांधी नगर भागातील अनेक अश्वपालकांना लाभ झाला. मदत करणार्‍यांमध्ये  गुडविल स्टड फार्म (दांडफाटा), आदित्य आपटे (विक्रोळी), मिलाप हुले, अर्जुन पार्थसारथी, अर्णव यादव, आर्यमान मोहन (सीवूड), अंशुमन मेनकर (नेरूळ), अनिका राणे (ठाणे), कॅप्टन शैलेंद्र जंगराणा  (बेलापूर), लाव्या कोतवाल (ठाणे), खुशबू गुप्ता (वाशी), किर्ती मनगुडकर (खारघर), मिहीर भाराणी (चेंबूर) यांचा समावेश आहे. खोपोली येथील प्रसिद्ध उद्योजक समीर पोतदार यांनी माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या गारबट वाडी येथील अश्वपालकांना अश्वखाद्य दिले, तर दलित महिला विकास मंडळाच्या (सातारा) अध्यक्ष अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी जुम्मापट्टी, असलगाव, टप्पा, मने या ठिकाणी अश्वखाद्य पुरविले. या वाटपाचे व्यवस्थापन रायगड जिल्हा हर हर चांगभलं धनगर समाज संस्था अध्यक्ष संतोष आखाडे, माथेरान धनगर समाज अध्यक्ष राकेश कोकळे, सामाजिक कार्यकर्ते मनोज गोरे यांनी केले. अनेक जणांनी स्वयंसेवक म्हणून या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply