अलिबाग : प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (महाड) कार्यकारी अभियंत्यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार म्हाप्रळ-आंबेत-पुरार रस्त्यावरील सावित्री खाडीवरील आंबेत पूल दुरुस्तीच्या कामाकरिता सर्व प्रकारच्या वाहतुकीस पुढील दोन महिन्यांकरिता बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी 4 मार्चपासून दोन महिन्यांकरिता हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
यापूर्वी कार्यकारी अभियंत्यांनी म्हाप्रळ-आंबेत-पुरार रस्त्यावरील सावित्री खाडीवरील आंबेत पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद करण्याबाबत केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने मंडणगड व दापोली येथून मुंबई, पुण्याकडे जाणार्या प्रवाशांसाठी म्हाप्रळ-महाड रस्ता व दापोली-लाटवण-करंजाडी-महाड, तर मुंबई व पुणे येथून मंडणगड व दापोलीकडे जाणार्या प्रवाशांसाठी महाड-म्हाप्रळ- मंडणगड व महाड-करंजाडी-लाटवण-दापोली या पर्यायी मार्गाने मार्गस्थ करता येईल, असे अभिप्राय दिलेले आहेत.
सावित्री खाडीवरील आंबेत पूल 376 मीटर लांबीचा असून तो जवळजवळ 43 वर्षे जुना आहे. या पुलाचा पाया कमकुवत झाल्याने दुरुस्तीसाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
Check Also
अखिल भारतीय टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका घोष विजेती
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल भारतीय आंतर संस्थात्मक टेबल टेनिस …