नवी दिल्ली : देशभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनामुळे एकूण 47 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 826वर गेली आहे. एकाच दिवसात आणखी 1 हजार 975 रुग्णांचीही भर पडली. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या 27 हजारांजवळ पोहोचली आहे. रविवारी (दि. 26) संध्याकाळी 6 वाजेपर्यंत देशातील कोरोना रुग्णांची संख्या 26 हजार 917 झाली होती. देशभरातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये बरे होऊन घरी गेलेल्या पाच हजार 914 लोकांचाही समावेश आहे. याचा अर्थ सध्या देशभरातील रुग्णालयांमध्ये 20 हजार 917 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने दिली.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …