
पनवेल : रामप्रहर वृत्त – कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी मदत नाहीतर कर्तव्य या भावनेतून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिकेतील भाजपच्या नगरसेविका मोनिका प्रकाश महानवर यांच्या माध्यमातून प्रभाग 10 व कळंबोलीतील सर्व किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, डेरीचालक, स्वच्छता दूत, इतर अत्यावश्यक कर्मचार्यांना तसेच प्रभागातील नागरिकांना एकूण 80 लिटर सॅनिटायझरचे मोफत वाटप करण्यात आले.