महाड : प्रतिनिधी
तालुक्यातील महत्वाच्या नाते ग्रामपंचायतीचे दोन सदस्य आणि अनेक महिला व तरुणींनी अॅड. सुरज जामदार यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाने नाते जिल्हा परिषद विभागात भाजपची ताकद वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासकामांनी प्रभावीत होऊन महाड तालुक्यातील नाते ग्रामपंचायतीचे सदस्य अॅड. सुरज जामदार व सायली पवार यांच्यासह अनेक महिला व तरुणींनी भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. दरम्यान, जामदार यांनी आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली नाते ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा सरपंच होईल तसेच नाते जिल्हा परिषदेमध्येही आम्ही पक्षाची ताकद वाढवू, असा विश्वास व्यक्त केला. या वेळी किशोर जामदार, रुपेश पवार, मनोहर पांडे, मोहन काप, बाळकृष्ण वाडकर, राजेंद्र रांजणकर, किरण काप, शांताराम गायकवाड, संजय अंबावले, शशिकांत पांडे, संदिप शिंदे, मुरली पांडे, अरविंद पांडे, श्रीकृष्ण गायकवाड, सुरेश पांडे, मनोज रांजणकर, तुकाराम अंबावले, किरण पवार, सहदेव पवार, दत्ताराम गुडेकर, चंद्रकांत जाधव, सुचित गुडेकर, गणेश अंबावले, महेश अंबिवले, नितीन पवार, प्रविण गायकवाड, प्रभाकर गुडेकर, सुभाष खुटवळ, रमेश झांजे, श्रीधर पांडे, संकेत पांडे, जयंत गायकवाड, विलास गायकवाड, गणेश गायकवाड, रोहित झांजे, आशा जामदार, उज्वल गायकवाड, अर्चना कदम, कविता गायकवाड, प्रिती गायकवार, श्रुती काप, रेखा झांजे, भारती वाडकर, वृषाली पवार, मीना पवार, दिक्षा अंबावले, वर्षा गायकवाड, राजश्री रांजणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, मिलींद पाटील, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा मानकार, तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, उपाध्यक्ष चंद्रजित पालांडे, संदिप ठोंबरे, तालुका सरचिटणीस महेश शिंदे, शहर अध्यक्ष निलेश तळवटकर, रुपेश घाडगे, योगेश धामनसे या वेळी उपस्थित होते.