Breaking News

उरणमधील बाळाची कोरोनावर मात

उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील जासई येथील 18 महिन्यांच्या बाळाने कोरोनाला हरविले आहे. प्रशासनाकडून याबाबतची माहिती देण्यात आली.
रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच एखाद्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याची घटना घडली होती. हे बाळ आजारी असल्याने त्याला 12 एप्रिल रोजी जासई येथील संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर उरणच्या इंदिरा गांधी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथून बाळास एमजीएम रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे त्याची कोविड-19 चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यामुळे चिंता व्यक्त होत होती, परंतु या बाळाने महामारीवर मात केली आहे. याकामी वैद्यकीय यंत्रणेने मेहनत घेतली. त्यांना प्रशासकीय अधिकार्‍यांचे सहकार्य लाभले.
या बाळाला सोमवारी (दि. 27) रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. या वेळी उपस्थितांनी मायलेकाचे टाळ्या वाजवून कौतुक केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply